Sexual Health: ‘डेंजरस’ पोझिशन्स: संभोगादरम्यान लिंग फ्रॅक्चर होण्याचा धोका कोणत्या स्थितींमध्ये सर्वाधिक असतो?
लैंगिक आयुष्य हे शारीरिक आणि मानसिक समाधानाशी जोडलेले असले, तरी संभोगादरम्यान बेफिकिरी किंवा चुकीच्या पोझिशन्समुळे गंभीर दुखापती होऊ शकतात. त्यातील सर्वात धोकादायक आणि वेदनादायक घटना म्हणजे “लिंग फ्रॅक्चर”. वैद्यकीय भाषेत याला “पेनाइल फ्रॅक्चर” म्हटले जाते. हे हाडाचे तुटणे नसून, लिंगातील ट्यूनिका अल्बुजिनिया नावाच्या स्नायूंच्या झिल्लीला झालेली फाट आहे.
लिंग फ्रॅक्चर म्हणजे काय?
लिंगात हाड नसते, परंतु त्यात रक्ताने फुगणाऱ्या दोन स्नायूंच्या नलिका असतात. संभोगादरम्यान अतिप्रेशर, चुकीची हालचाल किंवा अचानक वाकणे झाल्यास या झिल्लीला फाट येते, आणि त्या क्षणी मोठा ‘पॉप’ किंवा ‘क्रॅक’ आवाज ऐकू येतो. त्यानंतर तीव्र वेदना, सूज आणि रक्तस्राव सुरू होतो.
तज्ज्ञ सांगतात की, वेळेवर उपचार न केल्यास या जखमेचे दीर्घकालीन परिणाम दिसून येतात — उदा. लिंग वाकणे, स्तंभनदोष (Erectile Dysfunction) किंवा संभोगादरम्यान वेदना.
कोणत्या पोझिशन्समध्ये धोका सर्वाधिक?
तज्ज्ञांच्या मते काही लैंगिक स्थितींमध्ये लिंग फ्रॅक्चरचा धोका इतरांपेक्षा अधिक असतो. यामध्ये खालील पोझिशन्स सर्वाधिक धोकादायक मानल्या जातात :
- ‘वुमन ऑन टॉप’ पोझिशन (महिला वर असते) —
या स्थितीत नियंत्रण स्त्रीकडे असते. चुकीच्या कोनात किंवा अचानक हालचालीमुळे लिंग वाकते आणि फाटण्याचा धोका निर्माण होतो. - ‘डॉगी स्टाईल’ पोझिशन —
ही पोझिशन जास्त खोल प्रवेशामुळे (deep penetration) जोखमीची ठरते. थोडासा चुकीचा कोन किंवा जोर जास्त झाल्यास टिश्यूज फाटण्याची शक्यता वाढते. - अचानक पोझिशन बदलणे किंवा अतिजोरात हालचाल करणे —
संभोगादरम्यान गती वाढवताना किंवा पोझिशन बदलताना काळजी घेतली नाही तर लिंग चुकीच्या दिशेने वाकू शकते, ज्यामुळे तात्काळ दुखापत होते.
उपचार कसा करतात?
लिंग फ्रॅक्चर ही वैद्यकीय आणीबाणी आहे. अशावेळी त्वरित युरोलॉजिस्टकडे जाणे आवश्यक असते. डॉक्टर अल्ट्रासाऊंडद्वारे दुखापतीचे प्रमाण तपासतात आणि आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया करतात. योग्य वेळी उपचार घेतल्यास ९० टक्के रुग्ण पूर्णपणे बरे होतात.
प्रतिबंध कसा करावा?
- संभोगादरम्यान अतिजोरात हालचाली टाळा.
- आरामदायी आणि दोघांनाही नियंत्रणात असलेली पोझिशन निवडा.
- अचानक पोझिशन बदलू नका.
- मद्यपानानंतर किंवा अती थकलेल्या अवस्थेत संभोग टाळा.
संभोग हे नात्यातील जवळीक आणि आनंदाचे प्रतीक आहे, परंतु त्याचबरोबर सुरक्षितता आणि काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. थोडी खबरदारी घेतली तर अशा वेदनादायक आणि धोकादायक प्रसंगांपासून सहज बचाव करता येऊ शकतो.
