
भिवंडी येथून एका धोकादायक बाइक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये बुरखा घातलेली एक मुलगी मागे बसण्याऐवजी दुचाकीस्वाराच्या समोर बसलेली दिसत आहे आणि दुचाकीस्वार हायवेवर धावणाऱ्या इतर वाहनांना ओव्हरटेक करत पुढे जात आहे. पाठीमागून धावणाऱ्या दुचाकीवर बसलेल्या तरुणाने त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.
काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, असा व्हिडीओ शूट होत असल्याचे पाहून स्टंट करणारा दुचाकीस्वार थांबतो आणि व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाला धमकी देताना दिसत आहे.
Video of bike rider goes viral..As at busy Thane bhiwandi highway. he is riding bike sitting a girl on bike tank ..@ThaneCityPolice @MumbaiPolice @MumbaiRTO pic.twitter.com/oRL2Fe7WH6
— EXPRESS NEWS HINDI (@expressnews4u) December 22, 2022