‘सात संमदर पार’ गाण्यावर नोरा फतेहीने केली लावणी, पाहा व्हिडीओ

WhatsApp Group

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोराचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नोरा फतेहीला बॉलिवूडमधील आघाडीची डान्सर म्हणून ओळखले जाते. तिला डान्सव्यतिरिक्त ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसाठीही ओळखले जाते. नुकतेच नोरा फतेहीचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नोरा ही चक्क लावणी करताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

नोराने ‘सात समंदर पार’ या गाण्यावर लावणी नृत्य सादर केले. हे गाणे उदित नारायण आणि साधना सरगम ​​यांनी गायले आहे. हे गाणे ‘विश्वात्मा’ चित्रपटातील आहे. या गाण्याच्या मूळ ट्रॅकमध्ये दिव्या भारती दिसली होती.

ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! या बातम्यांसाठी आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये नक्की Add व्हा https://chat.whatsapp.com/FT9G2GTaGLm4DsImkvflms

For more updates, be socially connected with us on – Instagram, Twitter, Facebook