Daler Mehndi Arrested: प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीला दोन वर्षांचा तुरुंगवास

WhatsApp Group

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी (Daler Mehndi) याला पंजाब पोलिसांनी मानवी तस्करी (Human Trafficking) प्रकरणात अटक केली आहे. पंजाबच्या पटियाला सत्र न्यायालयाने मानवी तस्करीप्रकरणी त्याला ठोठावलेला तुरुंगवास कायम ठेवला आहे. गायकावर अवैधरित्या लोकांना परदेशात पाठवल्याचा आरोप आहे.

पटियालाच्या न्यायदंडाधिकारी न्यायालयाने मेहंदीला दोन वर्षांचा तुरुंगवास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याने या शिक्षेला पटियालाच्या सत्र न्यायालयामध्ये आव्हान दिले होते. तेथेही शिक्षा कायम राहिल्यामुळे गुरुवारी त्याला अटक करण्यात आली. दलेरला आता शिक्षा भोगण्यासाठी पटियाला सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात येणार आहे. माजी क्रिकेटपटू नवज्योत सिद्धूही याच तुरुंगात आहेत.