मुंबई – माटुंगा रेल्वे स्थानकावर दोन एक्स्प्रेस समोरासमोर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये गदग एक्स्प्रेसच्या इंजिनने प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला धडक दिल्यामुले हा प्रकार घडला आहे. धडक झाल्यानंतर मोठा आवाज झाल्यामुळे गदग एक्स्प्रेसमधील सर्व प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या अपघातामुळे जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी ही घटना घडली. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेल्या गदग एक्स्प्रेसच्या इंजिनने माटुंगा रेल्वे स्थानकावर पाँडिचेरी एक्स्प्रेसला मागच्या बाजूने धडक दिली. या दोन्ही एक्स्प्रेस एकाच वेळी दादरहून निघाल्या होत्या, मात्र, माटुंगा स्थानकावर पुढे असणाऱ्या पुदुच्चेरी एक्स्प्रेसला मागच्या बाजूने गदग एक्स्प्रेसने धडक दिली.
दोन ट्रॅक एकमेकांना क्रॉस करत असल्याच्या ठिकाणी ही धडक झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पाँडिचेरी एक्स्प्रेसचे मागच्या बाजूचे ३ डबे रुळावरून घसरल्याची माहिती देण्यात आली आहे.
As per information recvd from control room 3 coaches of train 11005 derailed near Dadar station.
No injury reported. Time 9.45pm.
Relief trains have been moved to site for early restoration.— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) April 15, 2022
दरम्यान, हा अपघात होण्यामागे नेमकं कारण काय याविषयी अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेविषयी देखील या अपघातानंतर शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.