बाप रे! 24 कोटींचा रेडा कधी पाहिलात का?

WhatsApp Group

नंदुरबार जिल्ह्यामधील सारंगखेडा घोडेबाजार प्रसिद्ध आहे. या बाजारपेठेत देशभरातून जातीचे घोडे येतात. या घोड्यांची खरेदी करण्यासाठी स्टार मंडळीडून मोठी मागणी होत असते. घोडे खरेदी-विक्रीवर करोडो रुपये खर्च केले जातात. सारंगखेडा बाजारपेठेत येणारे काही घोडे कोट्यवधींचे असतात. महागडे घोडे पाहण्यासाठी अनेक घोडेप्रेमी सारंगखेडा घोडेबाजारात दाखल होतात.

सारंगखेडच्या बाजाराप्रमाणेच राजस्थानमधील शेतकऱ्यांच्या जत्रेत घोड्याला नव्हे तर रेडा पाहण्यासाठी गर्दी होत आहे. या रेडयाची किंमत 24 कोटी रुपयांपर्यंत आहे.

राजस्थानमधील जोधपूर येथे शेतकऱ्यांचा मेळावा सुरू आहे. या मेळाव्याचे महत्वाचे आकर्षण म्हणजे भीमा नावाचा रेडा. या सभेला येणारा नेता असो, मंत्री असो वा सामान्य माणूस, प्रत्येकजण हा रेडा बघायला येत आहे. त्याच्यासोबत सेल्फी काढत आहे  त्याला पाहण्यासाठी अनेक लोक मेळाव्यात येत आहेत.