चहा बनवताना सिलिंडरचा स्फोट, 11 महिन्यांच्या मुलीसह 4 जणांचा मृत्यू

0
WhatsApp Group

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात शनिवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. येथे एक महिला घरी चहा बनवत असताना सिलेंडरचा स्फोट झाला. या घटनेत चहा बनवणारी महिला आणि तिच्या तीन मुलांचा मृत्यू झाला. हे प्रकरण भलुआनी परिसरातील डुमरी गावचे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवशंकर गुप्ता यांच्या पत्नी आरती देवी (35) या सकाळी चहा बनवत असताना अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये आरतीसह तिची मुले आंचल (14), कुंदन (12) आणि 11 महिन्यांची सृष्टी यांचाही मृत्यू झाला.

या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास अहवाल प्रशासनाकडे पाठवला आहे.