‘मेंडोस’ चक्रीवादळाचा इशारा, पुढील 48 तासांत तामिळनाडूच्या अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता, शाळा-महाविद्यालये बंद

WhatsApp Group

Cyclone Mandous: मेंडोस चक्रीवादळ आज (9 डिसेंबर) मध्यरात्री चेन्नईजवळील किनारपट्टी ओलांडू शकते. हे मांडूस चक्रीवादळ तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीकडे सरकत आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन IMD ने तामिळनाडूतील चेंगलपट्टू, विल्लुपुरम आणि कांचीपुरममध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याच्या (MID) अलर्टनंतर, तामिळनाडू सरकारने 10 जिल्ह्यांमध्ये NDRF आणि राज्य सुरक्षा दलाच्या 12 तुकड्या तैनात केल्या आहेत. चेट्टाई, विल्लुपुरम, कुड्डालोर आणि कांचीपुरम जिल्ह्यात आज सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेंडोस चक्रीवादळ आज मध्यरात्री आंध्र प्रदेशातील हरिकोटा किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.

मुसळधार पावसाचा इशारा 

तामिळनाडूमध्ये 8 डिसेंबरला मुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा भारतीय हवामान खात्याने आधीच दिला होता. त्यात पुद्दुचेरी आणि कराईकलचाही समावेश आहे. दुसरीकडे, तामिळनाडूच्या नमक्कल, थिरुपूर, कोईम्बतूर, निलगिरी, दिंडीगुल, थेनी, मदुराई, शिवगंगाई, विरुधुनगर आणि तेनकासी जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

ताशी 105 किमी वेगाने वारे

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागराच्या नैऋत्येला तयार झालेल्या मेंडोस चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे ताशी 105 किमी वेगाने वारे वाहू शकतात. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास महाबलीपुरमजवळ तामिळनाडू किनारपट्टीवर पोहोचण्यापूर्वी ते हळूहळू चक्रीवादळात कमकुवत होईल.