CSK Vs KKR: चेन्नई सुपर किंग्जकडून कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव; 7 गडी राखत मिळवला विजय
IPL 2024 CSK vs KKR: इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 22 वा सामना आज चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders) यांच्यात खेळला गेला. चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करायला आलेला श्रेयस अय्यरचा संघ पत्त्याच्या गठ्ठासारखा विखुरलेला दिसत होता.फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकात 138 धावा केल्या होत्या. हा सामना चेन्नई सुपर किंग्जने जिंकला आपल्या नावावर केला आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेच्या फलंदाजांनी एका बाजूला विकेट्स रोखून ठेवल्या आणि दुसऱ्या बाजूला धावफलक सुरू ठेवला. चेन्नईने 14 चेंडू बाकी असताना हा सामना जिंकला आणि कर्णधार रुतुराज गायकवाडच्या 67 धावांच्या नाबाद अर्धशतकाने या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कोलकाताने आयपीएल 2024 मध्ये सलग 3 विजय नोंदवले होते, परंतु चेन्नई हा चालू हंगामात त्यांना पराभूत करणारा पहिला संघ ठरला आहे.
Another day at Anbuden! 🥳✅#CSKvKKR #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/ovC5u589aF
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 8, 2024
चेन्नईच्या विजयात रचिन रवींद्रने 15 आणि डॅरिल मिशेलने 25 धावांचे योगदान दिले. चेन्नईने पहिल्या 10 षटकात 1 गडी गमावून 81 धावा केल्या होत्या, ज्यामुळे त्यांना विजय मिळवणे खूप सोपे झाले कारण संघाला शेवटच्या 10 षटकात 57 धावा हव्या होत्या आणि त्यांच्या 9 विकेट्स शिल्लक होत्या. 13व्या षटकात मिशेल बाद झाला असला तरी त्यानंतर प्रभावशाली खेळाडू म्हणून फलंदाजीला आलेल्या शिवम दुबेने दरवेळप्रमाणेच तुफानी शैलीत फलंदाजी करत सामना एकतर्फी केला. शिवम दुबेने 18 चेंडूत 28 धावांच्या स्फोटक खेळीत 1 चौकार आणि 3 षटकार ठोकले.
Captain’s turn to shine! 5️⃣0️⃣🦁🌟#CSKvKKR #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/HlvpVhyY6P
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 8, 2024
केकेआरच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर संघाची सुरुवात चांगली झाली नाही कारण फिलिप सॉल्ट पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. पण त्यानंतर फिलिप सॉल्ट आणि आगरीश रघुवंशी यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. त्यानंतर सुनील नरेन 27(20) धावांवर बाद झाला. रघुवंशी 24(18), व्यंकटेश अय्यर 3(8), रमणदीप सिंग 13(12), रिंकू सिंग 9(14), आंद्रे रसेल 10(10), मिचेल स्टार्क 0 धावांवर बाद झाले. श्रेयस अय्यरने 32 चेंडूत 34 धावांची खेळी खेळली, जी या डावात केकेआरसाठी खेळलेली सर्वात मोठी खेळी होती.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. तुषार देशपांडे आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 3, मुस्तफिजुर रहमानने 2 आणि महिष तिक्षानाने 1 बळी घेतला.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
कोलकाता नाइट रायडर्स: फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), आंक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश तिक्षाना.