रडणं आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या रडण्याचे फायदे

WhatsApp Group

रडणं (crying) हे नेहमीच कमीपणाचं किंवा दुबळेपणाच लक्षण मानलं जात. हळव्या मनाची माणसंच जास्त रडतात असेही म्हटले जात. पण एका संशोधनानुसार कधी कधी रडणं हे प्रत्येकाच्याच आरोग्यासाठी उपयुक्त आहे. विज्ञानाने (science) या गोष्टीचा खुलासा केला आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या भावना खुलून व्यक्त करता तेव्हा तुम्हाला हसण्यासोबतच रडूही येतं. आणि याचेच अनेक फायदे सुद्धा आहेत.

रडण्याचे फायदे खालीलप्रमाणे

  • जेव्हा कोणत्याही तणावाने मनुष्य रडतो तेव्हा त्याच्या शरिरातील विषारी पदार्थ अश्रूंच्या स्वरूपात बाहेर पडतात. हे अश्रू अनेक प्रकारचे चांगले हार्मोन्स रिलिज करतात जे शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेमंद असतात.
  • 2015 च्या संशोधनातून समोर आले आहे की जेव्हा लहान बाळ रडते त्यानंतर लगेच त्याला शांत गाढ झोप लागते. रडण्यामुळे डोक शांत होत आणि अस्वस्थता कमी होते आणि शांत झोप लागते.
  • अश्रू डोळ्यांना साफ ठेवण्याचे काम करतात याशिवाय अनेक बँक्टेरिया पासूनही बचाब करतात. 2011 साली झालेल्या एका संशोधनामध्ये अश्रूंमधे असलेल्या लाईसोझाइम तत्त्वात उत्तम एंटीबँक्‍टीरियल प्रॉपर्टीज़ असतात जे डोळ्यांना बायोटेरर एजंट्स पासून वाचवतात.

 

  • जेव्हा तुम्ही मन भरून रडता तेव्हा तुमच मन हलक होत. मेडिकल न्यूज टुडे च्या अनुसार 2014 साली झालेल्या एका संशोधनामध्ये असा निष्कर्श काढण्यात आला कि जेव्हा तुम्ही चिंतेत असाल आणि कोणतीच गोष्ट मनासारखी होत नसेल तेव्हा मनभरून रडा, तुम्हाला आंतरिक आराम मिळेल. याशिवाय ताणतणाव (stress) देखिल कमी होईल आणि चांगला निर्णय घेण्यास तुम्ही सक्षम व्हाल.
  • जेव्हा तुम्ही रडता तेव्हा शरिरात ऑक्‍सीटॉसिन आणि इंडोरफिर ही रसायणं स्त्रवतात जी तुमच्या मूड ला ठिक करण्यासोबतच मानसिक (mental) आणि शारिरीक (physical) दु:ख ही कमी करतात.
  • जेव्हा तुम्ही मनभरून रडता तेव्हा शरिरात ऑक्‍सीटॉसिन आणि इंडोरफिर ही रसायणं स्त्रवतात. ही फील गुड रसायणं आहेत डी हळू हळी तुम्हाला हलक फील करायला मदत करतात.
  • नँशनल आए इंस्टीट्युट च्या अनुसार मुलभूत अश्रू डोळ्यांचा प्रकाश वाढवतात. आणि स्वच्छ दिसण्यास मदत होते. डोळ्यातील ओलावा कायम ठेवण्यास मदत होते व डोळे सुखण्यापासून बचाव होतो.