एकीकडे फुटबॉलचा महासंग्राम फिफा विश्वचषक (Fifa World Cup 2022) सुरु असताना फुटबॉल जगतातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पोर्तुगालचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेड (Manchester United) क्लबपासून वेगळा झाला आहे. दोघांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं क्लबकडून सांगण्यात आलं आहे. मँचेस्टर युनायटेडने सोशल मीडियावर चाहत्यांना याची माहिती दिली.
ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गन यांच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीमुळे रोनाल्डोला तीव्र टीकेचा सामना करावा लागला. तेव्हापासून तो लवकरच हा क्लब सोडणार असल्याची अटकळ बांधली जात होती.ख्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडसाठी 346 सामन्यांत 145 गोल केले आहेत. संघासोबत दोन हंगाम घालवल्याबद्दल आणि उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल क्लबने त्याचे आभार मानले आहेत.
Cristiano Ronaldo is to leave Manchester United by mutual agreement, with immediate effect.
The club thanks him for his immense contribution across two spells at Old Trafford.#MUFC
— Manchester United (@ManUtd) November 22, 2022
रोनाल्डोला खेळण्याची संधी मिळत नव्हती
या मोसमात रोनाल्डोला क्लबच्या अनेक सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला सुरुवातीच्या इलेव्हनमध्येही स्थान मिळाले नाही. तो अनेक सामन्यांमध्ये बदली खेळाडू म्हणून खेळला. फुलहॅमविरुद्धच्या संघात रोनाल्डोचेही नाव नव्हते. संघाने हा सामना 2-1 असा जिंकला.
Join our WhatsApp Group, Instagram, Facebook Page and Twitter for every update