FIFA WC 2022 दरम्यान Cristiano Ronaldoवर मोठी कारवाई

WhatsApp Group

फुटबॉल दिग्गज आणि मँचेस्टर युनायटेडचा माजी खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोला त्याच्या चाहत्याचा फोन तोडणे महागात पडले आहे. त्याने या वर्षाच्या सुरुवातीला एव्हर्टन येथे एका चाहत्याचा मोबाईल हिसकावून तो फोडला होता. या प्रकरणावर कारवाई करत फुटबॉल असोसिएशनने त्याच्यावर 50,000 पौंड (सुमारे 49.43 लाख रुपये) दंड ठोठावला आहे. याशिवाय त्याच्यावर दोन सामन्यांची बंदीही घालण्यात आली आहे. रोनाल्डोने नुकताच मँचेस्टर युनायटेडसोबतचा करार संपवला आहे.

नेमकं प्रकरण काय?

या वर्षी 9 एप्रिल रोजी, रोनाल्डोचा संघ गुडिसन पार्क येथे एव्हर्टनकडून 1-0 ने हरला. यानंतर रोनाल्डो मैदानाबाहेर आला तेव्हा एक चाहता त्याचा व्हिडिओ बनवत होता. संघाच्या पराभवाने संतापलेल्या रोनाल्डोला ते आवडले नाही. त्यांनी फॅनचा मोबाईल हिसकावून तो फोडला. वादानंतर एफएने त्याच्यावर अयोग्य वर्तनाचा आरोपही केला आहे. दरम्यान आता त्याला दोन सामन्यांसाठी निलंबित केले आणि दंडही ठोठावला आहे. रोनाल्डोनेही आपले वर्तन अयोग्य असल्याचे मान्य केले. दरम्यान रोनाल्डोवर घालण्यात आलेली बंदी ही केवळ एफए कप स्पर्धेपुरती मर्यादित राहिल.

या घटनेनंतर रोनाल्डोने इंस्टाग्रामवर माफी मागितली, “आपण ज्या कठीण क्षणांचा सामना करत आहोत त्यामध्ये भावनांना सामोरे जाणे कधीही सोपे नसते. तरीसुद्धा, आपण नेहमीच त्या सर्व तरुणांचा आदर, संयम आणि दयाळूपणे वागले पाहिजे. मी माझ्या नाराजीबद्दल माफी मागू इच्छितो आणि शक्य असल्यास, मी या समर्थकाला ओल्ड ट्रॅफर्ड येथे सामना पाहण्यासाठी निमंत्रित करतो असं तो म्हणाला होता.

Join our WhatsApp Group, Instagram, Facebook Page and Twitter for every update