मुंबई – महाराष्ट्रात हिंगोली जिल्हामध्ये आणि आसपासच्या भागांमध्ये मागील चार पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील चार दिवसात मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि वादळी वारे वाहतील असा अंदाज वर्तविला आहे.
कमाल तापमान हळू हळू वाढणार. सात आणि आठ मार्च रोजी आकाश ढगाळ राहणार असून. आठ मार्च रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तविण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी काढणीस तयार असलेले पिकांची काढणी करून घ्यावी. पिक सुरक्षित जागेत झाकून ठेवावी. शेतकऱ्यांनी गाय, बैल, म्हैस, रेडा हे पशुधन सुरक्षित जागेत बांधून ठेवावे, अशा सूचना हवामान विभागाने दिल्या आहेत. मराठवाड्यामध्ये ९ ते १५ मार्चपर्यंत कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची तर तर किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.