पुढचे दोन दिवस महत्वाचे; देशात वादळी वाऱ्यासह पावसाचं संकट, ‘या’ ठिकाणी कोसळणार सरी

WhatsApp Group

पुणे – सध्या उत्तर भारतातील अनेक राज्यामधून थंडी गायब झाली आहे. थंडी गायब होताच आता वातावरणामध्ये मोठे बदल जाणवू लागले आहेत. काल दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यात वेगवान वाऱ्यासह पावसाने हजेरी (Rainfall) लावली आहे. तर काही भागांत गारपीट (Hailstorm) देखील झाली आहे. रात्री उशिरापर्यंत याठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला आहे. आज पुन्हा दिल्लीसह उत्तरेतील काही भागांमध्ये हवामान खात्याने (IMD) पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

त्याचबरोबर येणाऱ्या दोन दिवसात अंदमान समुद्र आणि दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा वेग 40 ते 50 किमी प्रतितास इतका राहण्याची शक्यता आहे. तर ०१ ते -३ मार्च दरम्यान नैऋत्य बंगालच्या उपसागर, दक्षिण बंगालचा उपसागर, तामिळनाडू किनारपट्टी आणि मन्नारचे आखात या भागात वादळी वारे वाहणार आहेत. त्यामुळे दरम्यानच्या काळात मच्छिमारांनी समुद्रात मासेमारी करायला जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.