लाल महालात लावणी करणं पडलं महागात, वैष्णवी पाटीलवर गुन्हा दाखल!

WhatsApp Group

पुणे – पुण्यातील प्रसिद्ध लाल महालात (Lal Mahal Lavni ) लावणी व्हिडीओ शूट करणे अभिनेत्री वैष्णवी पाटीलला चांगलंच महागात पडलं आहे. लाल महालामध्ये व्हिडिओ शूट केल्याप्रकरणी अभिनेत्री वैष्णवी (Vaishnavi Patil) पाटील हिच्यासोबत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री वैष्णवी पाटील, मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांच्याविरोधात फरासखाना पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील लाल महालामध्ये लावणी नृत्य केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे. अभिनेत्री वैष्णवी पाटीलने 16 एप्रिल रोजी पुण्याच्या लाल महालात चंद्रमुखी (Chandramukhi Movie) या चित्रपटातील प्रसिद्ध चंद्रा (Chandra Song) गाण्यावर लावणी शूट केली होती. रिल्ससाठी वैष्णवीने व्हिडिओ शूट करत लावणी केली होती. तिच्या लावणीचा ( Vaishnavi Patil Chandra Video) हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होता. वैष्णवीच्या या लावणी रिल्सवर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला. तसंच, शिवप्रेमी संघटेनेने जोरदार आक्षेप घेतला आहे.

VIDEO : “आमच्यावर होणारे बलात्कार थांबवा”, विवस्त्र होत ‘कान्स’च्या रेड कार्पेटवर घुसली महिला

रखवालदार राकेश सोनावणे यांनी याप्रकरणी पुण्याच्या फरासखाना पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर वैष्णवी पाटील हिच्यासोबत चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व घडामोडींनंतर वैष्णवी पाटीलने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत या माध्यमातून या सर्वप्रकारावर जाहीर माफी मागितली आहे.