भारताचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैनाचे वडील त्रिलोक चंद रैना यांचे रविवारी निधन झाले आहे Suresh Raina father passed away. दीर्घकाळ कर्करोगाने त्रस्त असलेल्या त्रिलोक चंद रैना यांची प्रकृती डिसेंबरपासूनच खालावली होती. गेल्या काही दिवसांपासून सुरेश रैना गाझियाबादमधील त्यांच्या राहत्या घरीच वडिलांची सेवा करत होता.
त्रिलोकचंद रैना हे भारतीय लष्करात कार्यरत होते. ऑर्डनन्स फॅक्टरीत बॉम्ब बनवण्यात ते पारंगत होती. त्यांचे मूळ गाव जम्मू-काश्मीरमधील रैनावरी येथे आहे. 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांनी आपले गाव सोडले होते.
सुरेश रैनाचे वडील त्रिलोक चंद यांच्या निधनानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
Very sad to hear Suresh Raina’s father @ImRaina RIP uncle ji ????????
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) February 6, 2022
यानंतर हे लोक गाझियाबादमधील मुरादनगर येथे आले. त्यांना दोन मुले दिनेश आणि सुरेश आणि दोन मुली आहेत. सुरेश रैनाने 3 एप्रिल 2015 रोजी प्रियंकासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्रिलोकचंद रैना यांनी आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी खूप कष्ट आहेत
हेही वाचा