Rohit Sharma Passes Away: क्रिकेट विश्वात शोककळा! क्रिकेटर रोहित शर्मा याचं निधन

WhatsApp Group

Rohit Sharma Passes Away: राजस्थानसाठी रणजी क्रिकेट खेळणाऱ्या माजी खेळाडू रोहित शर्माचे वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले. त्याच्या निधनामुळे क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. तो  बऱ्याच दिवसांपासून आजारी होता आणि त्याने शनिवारी अखेरचा श्वास घेतला. राजस्थानच्या झंझावाती फलंदाजांमध्ये रोहित शर्माच्या नावाचा समावेश होतो. तो राजस्थानसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळत होता आणि तो राजस्थान संघासाठी त्याने 7 रणजी सामने खेळला आहे.

वयाच्या 40 व्या वर्षी निधन: राजस्थानकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या रोहित शर्माचा जन्म 7 नोव्हेंबर 1983 रोजी जयपूर शहरात झाला. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती आणि त्याने आपल्या घरच्या संघात स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला. रोहितने 7 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 53.54 च्या स्ट्राइक रेटने आणि 12.76 च्या सरासरीने 166 धावा केल्या. 28 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 75.15 च्या स्ट्राइक रेटने आणि 35.41 च्या सरासरीने 850 धावा केल्या. त्याच वेळी, 4 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 135.05 च्या स्ट्राइक रेटने आणि 32.75 च्या सरासरीने 131 धावा केल्या. त्याने राजस्थानकडून 7 विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला.

राजस्थानसाठी रणजी क्रिकेट खेळणाऱ्या माजी खेळाडू रोहित शर्मा याचं निधन झालंय. रोहित शर्मा याच्या निधनामुळे अनेक युवा खेळाडू आणि सहकाऱ्यांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. रोहितने राजस्थानचं 7 रणजी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. त्याशिवाय रोहित 28 एकदिवसीय रणजी सामने आणि 4 टी 20 सामनेही खेळला होता. रोहितच्या नावाने जयपूरमध्ये आरएस अकादमीही होती. सोशल मीडियावर रोहित शर्माच्या निधनाची अर्धवट माहिती व्हायरल झाली आहे, ज्यामुळे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याचं निधन झाल्याचा गैरसमज अनेक क्रिकेट चाहत्यांचा झालाय. मात्र निधन झालेला रोहित शर्मा हा राजस्थानचा आहे.