क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं नुकसान, 3 महिन्यात 3 क्रिकेटपटूंचे निधन

WhatsApp Group

क्रीडा जगतासाठी रविवारी सकाळी एक दु:खद बातमी समोर आली आहे.ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं नुकसान म्हणजे गेल्या तीन महिन्यांत या तिसऱ्या दिग्गज क्रिकेटपटूचा मृत्यू झाला आहे.

अशा स्थितीत गेल्या तीन महिन्यांचा काळ ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी अतिशय दुःखाचा गेला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपले तीन दिग्गज क्रिकेटपटू गमावले आहेत. यामुळे क्रीडा विश्वातही शोककळा पसरली आहे. सर्व प्रथम, 4 मार्च रोजी माजी यष्टिरक्षक फलंदाज रॉड मार्श यांचे निधन झाले.

4 मार्च रोजी दुसरी बातमी आली की जादूचा लेगस्पिनर शेन वॉर्न यांचेही निधन झाले. 74 वर्षीय रॉड मार्शप्रमाणेच 52 वर्षीय वॉर्नचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आता अँड्र्यू सायमंड्सनेही जगाचा निरोप घेतला आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज रॉड मार्श यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रॉयल अॅडलेड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते कोमात गेले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच ४ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. वेगवान गोलंदाज डेनिस लिलीसोबत मार्शची जोडी उत्कृष्ट होती. या दोघांनी मिळून कसोटी क्रिकेटमध्ये 95 बळींचा विक्रम केला आहे. मार्शने 96 कसोटी सामने खेळले आणि तीन कसोटी शतके झळकावली आहेत.

शेन वॉर्नचे 4 मार्च रोजी वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. शेन वॉर्न थायलंडमधील कोह सामुई येथे सुट्टी घालवण्यासाठी गेला होता. वॉर्न त्याच्या व्हिलामध्ये बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. रुग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. वॉर्नने त्याच्या 145 सामन्यांच्या कसोटी कारकिर्दीत 708 बळी घेतले, जे मुथय्या मुरलीधरन (800 विकेट) नंतर कसोटी क्रिकेटमधील सर्वोच्च विकेट आहे. वॉर्नने 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 293 विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सने देखील जगाचा निरोप घेतला आहे. शनिवारी (14 मे) रात्री साडेदहाच्या सुमारास कार अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

सायमंड्स यांनी आपल्या कारकिर्दीत 26 कसोटी, 198 एकदिवसीय आणि 14 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत 1462 धावा, एकदिवसीय सामन्यात 5088 धावा आणि टी-20 मध्ये 337 धावा केल्या आहेत. सायमंड्सने आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्ससाठी 39 सामनेही खेळले आणि 974 धावा केल्या.