सलमान खानने आपल्या शेजाऱ्यांविरुद्ध दाखल केला मानहानीचा दावा, न्यायालयाने याचिका फेटाळली
मुंबई – बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खान अनेकदा मुंबईतील पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसवर वेळ घालवत असतो. अलीकडेच सलमान खानने त्याच्या फार्महाऊसच्या शेजाऱ्यावंर मानहानीचा खटला दाखल केला आहे. ज्यावर आता मुंबई शहर दिवाणी न्यायालयाने सलमान खानच्या बाजूने कोणताही प्रतिबंधात्मक आदेश देण्यास नकार दिला आहे.
सलमानच्या पनवेलमधील त्याच्या फार्महाऊसजवळील जमिनीचा मालक केतन कक्कर याने एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आपली बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला सलमान खानने होता. या प्रकरणात न्यायाधीश अनिल एच लद्दड यांनी केतन कक्करला सलमान खानने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यावर उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले असून न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ जानेवारी निश्चित केली आहे.
सलमान खानने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, केतन कक्करने एका यूट्यूब चॅनलवर बोलताना आपल्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यामुळे माझ्याबद्दल असलेला हा आक्षेपार्ह कंटेट काढून टाकला जावा आणि ज्या प्लॅटफॉर्मवर हा कंटेट उपलब्ध आहे ते ब्लॉक केले जावे, अशी मागणी सलमानने केली आहे.
अधिक बातम्या वाचा
धक्कादायक बातमी: दारू पिल्याने पाच जणांचा मृत्यू
पुजारा आणि रहाणेला आता संघाबाहेर काढा, सोशल मीडियावर चाहत्यांची मागणी
24 तासांत भारतात आढळले 2 लाख 68 हजार 833 कोरोना रुग्ण, तर एवढ्या लोकांचा झाला मृत्यू