राणेंना धक्का! न्यायालयाने नितेश राणेंना दिली २ दिवसांची पोलीस कोठडी!

WhatsApp Group

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणेंचा जामीन फेटाळत अटकपूर्व जामीन देण्यास सिंधुदुर्ग न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर राणेंच्या वतीने जेष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केला होता. हा अर्ज मागे घेण्यात आल्याचे मानेशिंदे यांनी सांगितले आहे. त्यानंतर नितेश राणे कणकवली न्यायालयात शरण आले असता न्यायालयाने नितेश राणे यांना २ दिवसांची म्हणजे ४ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नितेश राणे यांच्याविरुद्धचा खटला गेल्या वर्षी 18 डिसेंबर रोजी झालेल्या संतोष परब हल्ला प्रकरणाशी संबंधित आहे, तक्रारदार, 44 वर्षीय संतोष परब यांनी दावा केला आहे की त्यांच्या दुचाकीला नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने धडक दिली होती.

संतोष परब यांनी आरोप केला होती की कारमधील प्रवाशांनी आपल्यावर हल्ला केला आणि त्यांच्यापैकी एकाने दुसर्‍या व्यक्तीला “गोट्या सावंत आणि नितेश राणे यांना माहिती द्यावी” असे सांगताना ऐकले आहे.