अमिताभ बच्चन, शाहरूख, अजय देवगण, रणवीर सिंह यांच्याविरोधात कोर्टात खटला

WhatsApp Group

मुंबई – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), शाहरुख खान (Shahrukh khan), अजय देवगण (Ajay Devgn) आणि रणवीर सिंह (Ranveer singh) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुटखा ब्रॅंडचे प्रमोशन केल्याप्रकरणी मुझप्परपुर येथील समाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाशम यांनी या अभिनेत्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार केलीय. त्यामुळे बॉलिवूडचे हे सुपरस्टार अडचणीत सापडले आहेत.

VIDEO: लग्नाच्या मंडपात पोहोचताच रडू लागली हृता, लग्नातील भावुक क्षण आले समोर

अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अजय देवगण आणि रणवीर सिंह यांच्यावर ४६७,४६८,४३९ आणि १२० ‘ब’ या कलमांतर्गत (police FIR filed) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आपल्या लोकप्रियतेचा गैरवापर करुन पैशांसाठी गुटख्याची जाहीरात करत असल्याचा आरोप या अभिनेत्यांवर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी न्यायलयामध्ये २७ मे रोजी होणार आहे.