सियाचीनमध्ये देशाचा पहिला अग्निवीर शहीद

0
WhatsApp Group

लडाखमधील सियाचीनमध्ये भारतीय लष्कराचे शूर सैनिक गवते अक्षय लक्ष्मण शहीद झाले आहेत. कर्तव्य बजावताना शहीद होणारे ते पहिले अग्निवीर सैनिक आहेत. लक्ष्मण हे भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सचा भाग होते. फायर अँड फ्युरी कॉर्प्सने सोशल मीडियावर पोस्ट करून लक्ष्मण यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनेही ट्विट करून ही माहिती दिली आहे. जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशियरमध्ये त्यांना तैनात करण्यात आले होते. बलिदान दिलेल्या जवानाचे पार्थिव रविवारी (22ऑक्टोबर) त्यांच्या घरी पाठवले जाणार असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.

अक्षय लक्ष्मण हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवासी असल्याची माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. लेह येथे मुख्यालय असलेल्या भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्समध्ये त्यांची पहिली पोस्टिंग झाली. भारतीय लष्करानेही या दु:खाच्या वेळी जवानाच्या कुटुंबासोबत खंबीरपणे उभे असल्याचे लिहिले आहे.

सियाचीन ग्लेशियर भारत-पाकिस्तान सीमेवर स्थित आहे, ज्याला जगातील सर्वात उंच युद्ध शिखर म्हटले जाते. येथील तापमान शून्याच्या खाली असल्याने ड्युटी करणे सोपे नाही.