Corona update : मास्क न लावल्यास होणार 500 रुपयांचा दंड

WhatsApp Group

Corona update : देशात सध्या कोरोना रुग्णांमद्धे मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान आता दिल्लीत पुन्हा एकदा मास्क न घातल्याबद्दल दंड आकारण्याचा नियम परत आला आहे. वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अरविंद केजरीवाल सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास 500 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी अधिसूचनेनुसार, खासगी चारचाकी वाहनांमध्ये एकत्र प्रवास करणाऱ्या व्यक्तींना या तरतुदीनुसार दंड लागू होणार नाही.

काल जाहीर झालेल्या दिल्लीतील कोरोनाच्या आकडेवारीनुसार, 24 तासांत कोरोनाचे 2495 नवीन रुग्ण आढळले आहेत. सात रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 8506 झाली आहे. दिल्लीत कोरोनाचा दैनिक सकारात्मकता दर 15.41 टक्के नोंदवला गेला. त्याचवेळी 24 तासांत 1466 रुग्ण बरे झाल्याची बाबही शासनाच्या आरोग्य बुलेटिनमध्ये सांगण्यात आली. दिल्लीत ऑगस्टमध्येच कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे दिल्ली सरकार पुन्हा एकदा चिंतेत पडले आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यात आले होते आणि अलीकडेच लोकांच्या चेहऱ्यावरून मास्क काढण्यात आला होता पण तो पुन्हा एकदा परत आला आहे. दिल्ली सरकार सातत्याने लोकांना कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. यावेळी अरविंद केजरीवाल सरकारची चिंता दुप्पट आहे कारण कोरोनाशिवाय मंकीपॉक्स विषाणूनेही राजधानीत दार ठोठावले आहे.

दिल्लीत आतापर्यंत मंकीपॉक्सचे दोन रुग्ण समोर आले आहेत. लोकनारायण जयप्रकाश रुग्णालयात मंकीपॉक्सच्या रुग्णांवर उपचाराची व्यवस्था सरकारने केली आहे. दिल्लीसह देशभरात आतापर्यंत मंकीपॉक्सची आठ प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे.