गेल्या 24 तासात देशात 44 हजार 877 नवीन कोरोना रुग्ण, 684 रुग्णांचा मृत्यू!

WhatsApp Group

नवी दिल्ली – भारतात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत आहे. देशात हळूहळू परिस्थिती सुधारू लागली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात कोरोना संसर्गाची 44 हजार 877 नवीन रुग्ण मिळाले आहेत corona update in india.

आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,26,31,421 झाली आहे. तर गेल्या 24 तासांत 684 रुग्णांच्या मृत्यूनंतर संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5,08,665 वर पोहोचली आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 1 लाख 17 हजार 591 लोक संसर्गातून बरे झाले आहेत, त्यानंतर आतापर्यंत कोरोना बरे झालेल्या लोकांची संख्या 4 कोटी 15 लाख 85 हजार 711 झाली आहे. त्याच वेळी, सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 5 लाख 37 हजार 45 आहे.

गेल्या 24 तासांत 49 लाख लसीकरण करण्यात आले

दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने सांगितले की, बुधवारी 49 लाख16 हजार 801 लाखांहून अधिक लोकांना लसीचे डोस देण्यात आले. ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील एकूण लसीकरणाचा आकडा आता 1,72,81,49,447 इतका आहे.

हेही वाचा

 ‘पुष्पा’ फेम रश्मिका ठरली Oops मोमेंटची शिकार! फोटो होतोय व्हायरल

24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम

मुंबई महापालिकेत उंदीर घोटाळा? शहरातील उंदीर मारण्यासाठी तब्बल 1 कोटींचा खर्च