Coronavirus: काळजी घ्या! आजची कोरोना आकडेवारी धास्ती वाढवणारी

WhatsApp Group

राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दिवसाला 800 – 900 असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसापासून हाच आकडा हजारापेक्षा जास्त आहे. तर आज राज्यातील कोरोना रुग्णसंख्येने गेल्या दोन महिन्यातील उच्चांक गाठला आहे. बुधवारी राज्यात तब्बल 2 हजार 701 रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईमध्ये 1765 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईकरांसाठी हि चिंतेची बाब आहे.

राज्यात 2आज 701 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 1327 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईमध्ये आज 1765 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनाच्या शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.