Coronavirus Updates: काळजी घ्या… देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले

WhatsApp Group

Coronavirus Updates: देशात कोरोनाचा कहर कायम आहे. एका दिवसाआधी कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर आज पुन्हा कोरोना रुग्ण वाढले आहेत. देशात गेल्या 24 तासांमध्ये 2745 नवे कोरोनाबाधित आढळले असून सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात मंगळवारी दिवसभरात नव्याने नोंद झालेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2236 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 4 कोटी 26 लाख 17 हजार 810 रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली.

गेल्या 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. मात्र तुलनेनं कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. मंगळवारी दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवशी 2338 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद आणि 19 जणांचा मृत्यू झाला.

देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या पाच लाखांच्या पुढे पोहोचली आहे. कोरोनामुळे भारतात एकुण 5 लाख 24 हजार 636 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.