Pandharpur Wari 2022: आषाढी यात्रेच्या तोंडावर पंढरपुरात कोरोनाचा विस्फोट

WhatsApp Group

Pandharpur Wari 2022: यंदाची वारी निर्बंधमुक्त असल्यामुळ लाखोंच्या संख्येने वारकरी वारीत सामील झाले आहेत. कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नसून एक आषाढीच्या (aashadhi wari 2022) तोंडावर कोरोनाचे सावट भक्तांवर घोंगावत आहे.पंढरपुरात तब्बल 39 कोरोनाबाधित सापडले असून एकाच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आषाढीच्या तोंडावर कोरोना पाय पसरत असल्यामुळे वारी काळात एक हजार रूग्ण क्षमतेचे विलगीकरण कक्षाची उभारणी केली असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली. प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून वारी काळात मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

यंदा तब्बल दोन वर्षांच्या खंडानंर वारी होत असल्यामुळे मोठ्या उत्साहात वारकरी सहभागी झाले आहेत, मात्र कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर पंढरपूरमध्ये (Pnadharpur wari 2022) एकादशीचा मोहत्त्सव साजरा होत आहे. यंदाच्या वारीत विक्रमी वारकरी सामील झाल्यामुळे भाविकांची गैरससोय टाळण्यासाठी 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे.