घरोघरी तिरंगा उपक्रम समन्वयाने यशस्वी करा – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सूचना

WhatsApp Group

 मुंबई : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी तिरंगा ( हर घर तिरंगा) उपक्रम सर्व विभागांनी समन्वयाने यशस्वी कराअशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याअंतर्गत घरोघरी तिरंगा उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली. मुख्य सचिव यांच्या दालनात झालेल्या बैठकीस अपर मुख्य सचिव राजेश कुमारअपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यासअपर मुख्य सचिव नितीन गद्रेमहसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीरप्रधान सचिव नंदकुमारप्रधान सचिव मनीषा वर्माप्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगीप्रधान सचिव सोनिया सेठीवन विभागाचे प्रधान सचिव वेणू गोपाल रेड्डीसचिव सुमंत भांगेसचिव रणजित सिंह देओलवैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी उपस्थित होते.

सर्व विभागांनी आपल्या अधिनस्त कार्यालयातआस्थापनामध्ये हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व इमारतीअधिकारी, कर्मचारी वसाहतीत तिरंगा फडकवला जाईल याबाबतची तयारी केली जावीअशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.

घरोघरी तिरंगा उपक्रमाबाबत जाणीव जागृती करावी. लोकांना उपक्रमाबाबत माहिती व्हावी यासाठी विविध माध्यमांतून माहिती शिक्षण संवाद उपक्रम राबविण्यात यावेतअशा सूचनाही मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.

घरोघरी तिरंगा उपक्रमाचे समन्वयक आणि ग्राम विकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या तयारीबाबत सादरीकरण केले.विभागाच्या जिल्हा आणि प्रादेशिक स्तरावरील कार्यालयात तिरंगा फडकवला जावा. शालेय शिक्षणसहकारमहसूल कृषी विभागाने अधिक प्रभावीपणे उपक्रमाची अंमलबजावणी करणे अपेक्षित आहेअसे सांगितले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी घरोघरी तिरंगा उपक्रमाच्या नियोजन बाबत माहिती दिली. त्यांनी उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी केलेल्या जिंगल्स आणि क्रिएटीव्ह याबाबत माहिती दिली.यावेळी एसटी महामंडळाचे कार्यकारी संचालक शेखर चन्नेसांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागगृह विभागआदिवासी विकास विभागकृषी विभाग यांचे अधिकारी उपस्थित होते.