”मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायचे…”, शिंदे सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान

0
WhatsApp Group

राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील आदिवासी मंत्री विजयकुमार गावित यांनी ऐश्वर्या रायबाबत वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, मासे खाल्ल्याने ऐश्वर्याचे डोळे सुंदर दिसतात. मासे खाल्ल्याने महिलांची त्वचा गुळगुळीत होते.  धुळ्यातील अंतुर्ली येथे आदिवासी मच्छीमारांना मासेमारी साहित्याचे वाटप केल्यानंतर कार्यक्रमात आदिवासी मंत्री बोलत होते. ते म्हणाले तुम्ही ऐश्वर्या रायला पाहिलंय का? ती समुद्राजवळ राहते. ती बंगळुरूच्या बीचवर राहते. ती रोज मासे खात असे. तुम्ही तिचे डोळे पाहिले आहेत का? मासे खाल्ल्यानंतर तुमचेही डोळे तिच्यासारखे होतील.

ते इथेच थांबले नाहीत तर पुढे म्हणाले की, मासे खाल्ल्याने बाईमाणूस चिकने दिसायला लागतात. माशाच्या तेलामुळे शरीराची त्वचा ही चांगली दिसते. कोणीही बघितलं तर लगेच पटणार. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

विजयकुमार गावित यापूर्वी राष्ट्रवादीत होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी अनेक पदे भूषवली. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या ते आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत.