अकोला – प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेमध्ये असतात. आता पुन्हा एकदा अकोला येथील एका कीर्तनामध्ये इंदुरीकर महाराजांची टीका करताना जीभ घसरल्याचे सांगितलं जात आहे. यावेळी इंदुरीकर महाराजांच्या निशाण्यावर युट्यूबर्स होते.
माझ्या कीर्तनाचे व्हिडिओ शेअर करून हजारो युट्यूबर्स कोट्यधीश झाले आहेत आणि आता माझ्या कीर्तनाच्या क्लिप तयार करून मलाच न्यायालयात उभे केले, अशी टीका इंदुरीकर महाराजांनी केली आहे.