औरंगाबाद – अमरावती आणि धुळे येथे छत्रपती शिवाजी महाराज Chatrapati Shivaji Maharaj यांच्या पुतळ्यावरुन मोठा वाद पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Bhagatsingh Koshyari यांच्या एका वक्तव्यावरुनही आता पुन्हा एकदा नवीन वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव तसेच राजभाषा मराठी दिनाचे औचित्य साधून औरंगाबादमध्ये Aurangabad आयोजित श्री समर्थ साहित्य संमेलनाचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले. त्यावेळी बोलताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा दाखला देत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
VIDEO: ‘समर्थ के बिना शिवाजी को कौन पूछेंगा’; औरंगाबादमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं वक्तव्य@BSKoshyari #BhagatSinghKoshyari #ChhatrapatiShivajiMaharaj #Aurangabad #म #मराठी pic.twitter.com/5EeMjXexaK
— Pravin Sindhu | प्रविण सिंधू ????????✊ (@PravinSindhu) February 27, 2022
भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले?
“चाणक्यांशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल? समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? शिवाजीला किंवा चंद्रगुप्ताला लहान नाही म्हणत आहे मी. पण गुरुचे आपल्या समाजामध्ये मोठे स्थान आहे. छत्रपतींनी समर्थांना म्हटले की, राज्य मला तुमच्या कृपेने मिळाले आहे. आपल्याकडे गुरुला गुरुदक्षिणा देण्याची परंपरा आहे. त्याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले की, ‘या राज्याची चावी मी तुम्हाला देतो’ त्यावर समर्थ म्हणाले की, ‘ही राज्याची चावी मला कुठे देता. तुम्हीच याचे ट्रस्टी आहात”, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे.