Video: ‘मग तुम्ही जीन्स आणि कंडोमही फुकट मागाल’, सॅनिटरी पॅडच्या मागणीवर महिला IAS अधिकाऱ्याचं उत्तर

बिहार महिला विकास निगमच्या व्यवस्थापकीय संचालकांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका कार्यक्रमादरम्यान शालेय मुलींनी सॅनिटरी पॅड मोफत देण्याची विनंती केली. यावर उत्तर देताना एमडी हरजोत कौर म्हणाल्या, ‘आज तुम्ही सॅनिटरी पॅड्स मागताय, उद्या कंडोम मागाल.’ त्यांनी असं उत्तर दिल्यामुळे आता चर्चा रंगली आहे.
एका शाळकरी मुलीने प्रश्न केला, “सरकार खूप मोफत वस्तू देत आहे. आम्हाला 20-30 रुपयांचे सॅनिटरी पॅड देऊ शकत नाही का? मुलीच्या प्रश्नाला उत्तर देताना आयएएस अधिकारी हरजोत कौर म्हणाल्या, “मागण्यांचा काही अंत आहे का? उद्या तुम्ही म्हणाल की सरकार जीन्स आणि सुंदर शूज देऊ शकते. जेव्हा कुटुंब नियोजनाचा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला मोफत कंडोमचीही गरज असते. तुम्हाला सरकारकडून वस्तू घेण्याची काय गरज आहे? हा विचार चुकीचा आहे.”
अब नितिश-तेजस्वि सरकार के IAS से मिलिए। हरजोत कौर बिहार की बेटियों को सानिटरी नैपकिन माँगने पर पाकिस्तान भेजेंगी। pic.twitter.com/VjVv0EF0AP
— Dr. Amrita Rathod BJP (@AmritaRathodBJP) September 28, 2022
मुलींनी यावेळी सरकार निवडणुकीच्या वेळी अनेक गोष्टींचं आश्वासन देत म्हटल्यावर त्या म्हणाल्या, “मत देऊ नका, व्हा पाकिस्तान,” असं उत्तर दिलं.
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा