काँग्रेस मराठ्यांना आरक्षण देईल – नाना पटोले

0
WhatsApp Group

मराठा आरक्षणावरून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. भाजपने महाराष्ट्र मध्ये जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न हा २०१४ पासूनच केलेला आहे. मनोज जरांगे यांचे पहिले आंदोलन नाही. परंतु हे आंदोलन समजाचा उद्रेक असल्याचा प्रहार नाना पटोले यांनी केलाय. धुळे येथे दौऱ्यावर जाताना छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ते माध्यमांशी बोलत होते.

भाजपला हे आरक्षण देता येत नसेल तर काँग्रेस मराठ्यांना आरक्षण देईल. आरक्षणासंदर्भात राहुल गांधी यांनी भूमिका स्पष्ट केली असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत. जरांगे-पाटील त्यामुळे हा जो उद्रेक मराठा समाजाने केलेला आहे तो फक्त भाजपच्या विरोधात आहे असे ते म्हणाले.महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न 2014 पासूनच भाजपने केलाय. निवडणुकीला समोरे जात असताना आमचं सरकार आल्यावर मराठ्यांना, धनगरांना विविध जातीच्या लोकांना सांगितलं की, आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. त्या प्रलोभनाच्या आधारेच ते केंद्रात आणि राज्यात सत्तेत आले, असा घणाघात नाना पोटोले यांनी केलाय.

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलाचं हे काही पहिले आंदोलन नाही. याआधीही खूप आंदोलन झाले आणि मराठा वादळ मुंबईच्या वेशीवर आणि आता मुंबईत पोहोचलय. भाजपने मराठा समाजाची दिशाभूल करून त्यांना फसवलं आहे, त्यामुळे हा उद्रेक भाजपच्या विरोधात असल्याचं पटोले म्हणालेत. काँग्रेसची भूमिका यामध्ये स्पष्ट आहे की तुम्हाला हे आरक्षण देता येत नसेल तर हे आरक्षण काँग्रेस देणार आहे त्याबद्दल राहुल गांधी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की जातीनिहाय जनगणना करून आरक्षणाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या जातींना आरक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणले जाईल. जरांगे पाटील यांच्या आंदोलमुळे राज्य नाही तर देश वेठीस धरला जाऊ शकतो. त्यामुळे या सरकारने समस्या सोडवता येत नसेल तर पायउतार व्हावे. काँग्रेस मराठ्यांना आरक्षण देईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.