Navjot Singh Sidhu; नवजोत सिंह सिद्धूला १ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा

WhatsApp Group

नवज्योत सिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. ३४ वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धूला एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आयपीसीच्या कलम ३२३ अंतर्गत सिद्धूला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

रोड रेज प्रकरण 1988 चे आहे. या प्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांना यापूर्वी दिलासा मिळाला होता. मात्र रोडरोजमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. आता त्याची सुनावणी करताना सिद्धूला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता पंजाब पोलीस सिद्धूला ताब्यात घेणार आहेत.