Santokh Singh Chaudhary Death: काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन

WhatsApp Group

जालंधरचे काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांचे निधन झाले आहे. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत संतोख सिंह सहभागी झाले होते. भारत जोडो यात्रेदरम्यान प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान यांच्यासह अनेक मंत्र्यांनी काँग्रेस खासदाराच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी ट्विटरवर शोक व्यक्त करताना खासदार संतोख सिंह चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे सांगितले आहे.

काँग्रेस खासदाराच्या निधनाची बातमी मिळताच राहुल गांधी यांनी आपली भारत जोडो यात्रा थांबवली आहे. ही बातमी समजताच राहुल गांधी यांनी थेट रुग्णालयात जाऊन काँग्रेस खासदाराच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस खासदार संतोख सिंह चौधरी यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.