नागपूर – राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप यांच्यातील संघर्ष चांगलाचं वाढताना दिसत आहे. दरम्यान आज भाजपचे शिष्टमंडळ केंद्रीय सचिवांची भेट घेणार आहे.
नागपूरमध्येही भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पाहायला मिळतं आहे. नागपूरात काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे मोठा तणाव निर्माण आला आहे.
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरासमोर निषेध आंदोलन सुरू केले आहे. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नितीन गडकरींच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी केली
तर त्याचवेळी भाजपचे कार्यकर्तेदेखील मोठ्या प्रमाणात नितीन गडकरींच्या घरासमोर जमा झाले आहेत. त्यामुळे आता तणाव वाढला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनासंबंधी केलेल्या वक्तव्याविरोधात काँग्रेसने राज्यात अनेक ठिकाणी भाजपविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले आहे. मोदींनी आणि भाजपने जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
दरम्यान आता नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी नितीन गडकरी यांच्या घरासमोर आंदोलन केले. यावेळी मोदी सरकार मुर्दाबादच्या घोषणा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या.