Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने गुरुवारी 42 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. काँग्रेसने 25 मार्च रोजी निवडणुकीसाठी 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, ज्यात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्य पक्षाचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या नावांचा समावेश होता.
कर्नाटकात एकाच टप्प्यात 10 मे रोजी निवडणुका होणार आहेत आणि मतमोजणी मे रोजी होणार आहे. सिद्धरामय्या वरुणा मतदारसंघातून, तर डीके शिवकुमार कनकापुरा मतदारसंघातून उमेदवार असतील.
Congress releases second list of 42 candidates for Karnataka Assembly elections pic.twitter.com/wzpumgNTf3
— ANI (@ANI) April 6, 2023
आतापर्यंत 166 उमेदवारांची नावे जाहीर
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत 166 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उर्वरित 58 जागांसाठी उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जातील, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
पहिल्या यादीत जाहीर झालेल्या 124 उमेदवारांच्या यादीनुसार, काँग्रेसने कोलार गोल्ड फील्ड मतदारसंघातून एम रूपकला यांना उमेदवारी दिली आहे. 124 उमेदवारांच्या यादीत सर्वात वयस्कर 91 वर्षीय शमानुरु शिवशंकरप्पा आहेत, ज्यांना दावणगेरे दक्षिणमधून तिकीट मिळवण्यात यश आले आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते केएच मुनियप्पा यांना देवनहल्ली विधानसभा मतदारसंघातून तिकीट मिळाले आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार कनकापुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. कर्नाटक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामलिंगा रेड्डी बीटीएम लेआउटमधून तर त्यांची मुलगी सौम्या रेड्डी बेंगळुरूमधील जयनगरमधून निवडणूक लढवणार आहेत.
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मुलाला चितापूरमधून तिकीट मिळाले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे हे चितापूरमधून निवडणूक लढवणार आहेत. कोबाबळेश्वर आणि गांधीनगर मतदारसंघातून एम.बी.पाटील आणि दिनेश गुंडूराव यांना तिकीट देण्यात आले आहे. विद्यमान आमदार व्यंकटरमणप्पा यांना पक्षाने तिकीट दिलेले नाही. दरम्यान, नुकतेच भाजप सोडलेल्या एमएलसी पुत्तण्णा यांना राजाजीनगरमधून तिकीट मिळाले असून माजी केंद्रीय मंत्री केएच मुनिअप्पा देवनहल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
कर्नाटक विधानसभेत 224 जागा आहेत. राज्यात सध्या सत्ताधारी भाजपचे 119 आमदार आहेत, तर काँग्रेसकडे 75 आणि त्याचा मित्र पक्ष जेडी(एस) 28 आमदार आहेत.
Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा