Nana Patole: मोदी सरकारविरोधात ईडीच्या कार्यालयासमोर 13 जूनला कॉंग्रेसचे आंदोलन, नाना पटोले यांची माहिती

WhatsApp Group

मुंबई – मोदी सरकारविरोधात 13 जूनला कॉंग्रेस नागपुर आणि मुंबई ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारने केंद्रीय तपास यंत्रणांना आपल्या बाहुल्या बनवल्या आहेत, आणि त्याचा वापर करुन विरोधकांवर गैरवापर केला जात आहे. याचा विरोध करण्यासाठी आम्ही ईडी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत.