
एखादे काम पूर्णत्वास येण्यासाठी ‘आत्मविश्वास’ हा खूप महत्वाचा असतो. कधी कधी अशी परिस्थिती उद्भवते की, त्यामुळे स्वत: वरील आत्मविश्वास कमी होऊ लागतो. अशावेळी तुम्हाला काही प्रेरणादायी आणि तुमचा आत्मविश्वास वाढवणारे कोट्स किंवा सुविचार वाचनात आले की, त्यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत मिळते.
- आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते.
- समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
- मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
- भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !
- घराची योग्यता व्यवस्था हीच घराची शोभा, संतुष्टता हीच घराची लक्ष्मी, समाधान हेच घराचे वैभव , धार्मिकता हाच घराचा कळस , अतिथ्य हेच घराचे सुख.
- नेहमी तत्पर रहा, बेसावध आयुष्य जगू नका.
- खूप कठीण आहे त्या माणसाला हरवणं. जो माणूस कठीण परिस्थितीत चालायला शिकला आहे.
- कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.
जसे झाडाला जगवण्यासाठी पाण्याची गरज असते तसेच माणसाला घडवण्यासाठी उत्तम सुविचारांची गरज असेल. म्हूणन जीवनात योग्य दिशा दाखवण्यासाठी सुविचार वाचणे गरजेचे आहे.
- मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
- जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
- माणूस हा काणत्याही धर्माचा नसून तो प्रथम माणूस असतो.माणुसकीने वागणे हाच प्रत्येक माणसाचा धर्म आहे. म्हणून प्रत्येकाने माणुसकीने वागावे.
- यश साजरं करणं ठीक आहे पण त्यापेक्षा महत्वाचं आहे अपयशातून धडा शिकणं.
- विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
- माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं.
- भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
- जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आपलं शरीर आहे ते चांगल असेल तर आपण जगातील कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो…
सुविचार हे माणसांना कठीण परिस्थितीत संकटाना सामोरे जाण्यासाठी मदत करत असतात. त्यामुळे जेव्हा आपणास संकटात एकटे वाटत असेल तेव्हा तुम्ही सुविचार वाचू शकता.
- फांद्या तोडून झाड मरत नाही, घर सोडून माया तुटत नाही आणि वेष बदलून स्वभाव पालटत नाही, आसक्ती मुळापासून तोडावी लागते.
- सोबत किती लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावा लागतो. म्हणून अडचणीत आधार शोधू नका.स्वतःलाच भक्कम बनवा.
- नाती कितीही वाईट असू दे ती कधीही तोडू नका कारण पाणी कितीही घाण असलं तरी ते तहान नाही तर आग तरी विझवु शकते.
- क्षमेसारखे तप नाही, संतोषापेक्षा मोठे सुख नाही, लोभासारखा रोग नाही, दयेपेक्षा मोठा धर्म नाही.
- गरुडासारखे उंच उडायचे असेल तर, कावळ्यांची संगत सोडावी लागेल.
- जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका. कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
- पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो.
- जेव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची.
सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही.
- गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.
- जवळच्या माणसाचा स्वभाव कितीही पुरेपूर माहित असला तरी जगावेगळी समस्या उभी राहिली तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.
- दृष्टिकोण हा मनाचा आरसा आहे तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.
- माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते.
- अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप !
- कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
- स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवायला शिका तरच इतर तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतील.
- मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.