
जीवनात स्वतःवर असलेला Self Confidence सर्वात महत्वाचा आहे. जर तुमच्या जवळ आत्मविश्वास असेल तर तुम्ही कोणतीही अडचण पार करू शकता. त्यामुळे आज आपण आत्मविश्वास वाढवणारे सुंदर मराठी सुविचार पाहणार आहोत.
1)“आत्मविश्वास वाढवणारे कोट्स वाचून तुम्ही प्रेरित व्हाल, पण जर काही तरी जीवनात मिळवायचे असेल तर रोज प्रेरित राहणे आवश्यक आहे.”
2) “आत्मविश्वास हा स्वतःमधून येतो, त्यामुळे स्वतःला आत्मसात करा.”
3) “पैज लावायची च असेल तर स्वतःसोबत लावा, जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल.”
4) “आयुष्य हे एकदाच मिळते, त्यामुळे ते मनापासून जगले पाहिजे, उद्याची चिंता न करता, आजच्या काळात जगणे गरजेचे आहे.”
5) “आत्मविश्वास तिथे कामी येतो जिथे, आशा सोडावी अशी वाटते.”
6) “आत्मविश्वास हा सुर्यासारखा असतो, तुम्ही जितकी मेहनत कराल तितकाच अधिक चमकेल.”
7) “Confidence हे एक प्रभावी अंजन आहे, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल, त्याला कासल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो.”
8) “स्वतःवर विश्वास असणे म्हणजे आयुष्याच्या युद्धाचे नेतृत्व करणे होय.”
9) “कष्ट अशी ही चावी आहे, जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते.”
10) “एखाद्या गोष्टी विषयीची भीती आपल्या आत्मविश्वासाला तडा पोहचवता कामा नये.”
11) “विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे.”
12) “जोपर्यंत आत्मविश्वास रुपी सेनापती पुढे होतं नाही तोपर्यंत आपल्या आतील शक्ति त्याचे तोंड पाहत राहतील.”
13) जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
14) “कोणीही तुमच्यासोबत नसेल, तर घाबरुन जाऊ नका कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात.”
15) कष्ट इतक्या शांततेत करा, की यश हमखास धिंगाणा घालेल.
16) गोड आवाजात किमया असते ,ज्याच्या आवाजात गोडवा,त्याला समस्या सोडविण्याचा त्रासच नाही.
17) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
18) जसे सोने तप्त केल्याने शुद्ध होते, तसे पश्चातापाने मन पवित्र होते.
19) चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो.
20) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
21) “विश्वास स्वतःवर ठेवला तर ताकद बनते आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी.”
22) “मी काहीतरी चांगलं करेल हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेलच हा आत्मविश्वास.”‘
23)“अपयश ही जर यशाची पहिली पायरी असेल तर आत्मविश्वास या त्या यशाचा पाया आहे.”
24) “तुम्हाला आयुष्यात एकच गोष्ट यश मिळवण्यापासून अडवू शकते ती म्हणजे हरण्याची भीती.”