![WhatsApp Group WhatsApp Group](https://insidemarathi.com/wp-content/uploads/2023/03/WhatsApp-Add.gif)
Marathi Suvichar Sangrah: जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुविचाराची गरज असते. सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. जीवन जगावं कसं हे शिकवतात, म्हणून नियमित सुविचाराचे वाचन व मनन केले पाहिजे. आम्ही तुमच्यासाठी येथे घेऊन आलो आहोत सर्वश्रेष्ठ मराठी सुविचार.
1 | अपयश म्हणजे संकट नव्हे; आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. |
2 | आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात. |
3 | आळसात आरंभी सुख वाटते, पण त्याचा शेवट दु:खात होतो. |
4 | आशा हीच जीवनाची सर्वात मोठी शक्ती असते ! |
5 | अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. |
6 | अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती. |
7 | आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ठ आकलन नेहमीच आवश्यक आहे. |
8 | आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो. |
9 | असत्य हे अपंग प्राण्याप्रमाणे असते, दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभे राहू शकत नाही. |
10 | असत्याचा विजय झाला तरी तो क्षणभंगूर असतो. |
Suvichar हि कोणत्याही भाषेची एक वेगळीच ओळख मानली जाते. कारण असे मानतात कि, जसे झाडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी पाण्याची गरज असते, तसेच मन समृध्द करण्यासाठी चांगल्या सुविचारांची गरज असते. चांगले सुविचार माणसाला अधिक समृध्द बनवतात.
11 | इतिहास घोकण्यापेक्षा इतिहास निर्माण करणे महत्त्वाचे. |
12 | उद्योगी माणूस कधीच निर्धन नसतो. |
13 | कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो. |
14 | कोणतीही विद्या, ज्ञान कधीच वाया जात नाही. |
15 | कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे. |
16 | कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याखेरीज तिची खरी किंमत कळत नाही. |
17 | कोमलता हा हृदयाचा धर्म आणि सबलता हा देहाचा धर्म. देहाला वज्रापेक्षाही अधिक मजबूत बनवा आणि हृदयाला फुलापेक्षाही अधिक कोमल बनवा. |
18 | खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो; घेण्यात किंवा मागण्यात नसतो. |
19 | खर्च करुन आवक शोधण्यापेक्षा आवक पाहून खर्च करावा. |
20 | घडून गेलेल्या गोष्टींकडे ढुंकूनही न पाहता पुढे घडणाऱ्या गोष्टींकडे पाहत रहा. |
प्रत्येक सुविचार हा व्यक्तिमत्त्व विकास आणि संस्कृती जपण्यासाठी अनमोल आहेत. किंबहुना सुविचार आणि म्हणी हे भाषेचे अलंकार आहेत.
21 | गवताच्या पात्यावरुन वाऱ्याची दिशा ओळखायला शिका. |
22 | घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये. |
23 | घटनांना विचारांचे स्वरुप देणे हे वाङमयाचे कार्य आहे. |
24 | चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो आणि बुध्दीचा विकास एकांतात होतो. |
25 | छोटे लोक नसते तर मोठ्या लोकांचे अस्तित्व शून्य असते. |
26 | चारित्र्यात सूर्याची तेजस्विता अन अंत:करणात चंद्राची शीतलता हवी. |
27 | जे अंत:करणातून येते तेच अंत:करणाला जाऊन भिडते. |
28 | ज्यांना जास्त गोष्टींची हाव असते त्यांना प्रत्येक गोष्टीची कमतरता असते. |
29 | जो स्वत: दु:खातून गेला नाही त्याला दुसऱ्याचे दु:ख कसे कळणार? |
30 | ज्याची कृती सुंदर तो सुंदर ! |
चांगले सुविचार आपल्याला प्रत्येक आव्हानात प्रेरित व सकारात्मक राहण्याचा मोलाचा सल्ला देतात. ते आपल्याला आशावादी राहण्यास सतत सुचवत असतात.
31 | जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला आणि समुद्राला विचारा. |
32 | ज्योतीचं महत्त्व आणि पावित्र्य हे अंधारात चाचपडणाऱ्यांनाच कळंत. |
33 | जीवनातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य ! |
34 | जगातील बहुतेक सज्जनांच्या वाट्याला दु:ख का येतं ? कारण दुर्दैवाला जवळ करण्याइतकी शक्ती, क्षमता त्यांच्याजवळ असते म्हणून ! |
35 | ज्याच्या गरजा कमी, त्याला सुख आणि स्वास्थ्य अधिक ! |
36 | झऱ्याचे रुपांतर नदीत होते आणि नद्या समुद्राकडे वाहत जातात. वाईट सवयींचेही असेच होते. |
37 | जो स्वत: उत्तम वागू शकतो, तोच उपदेश करु शकतो. |
38 | ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली. |
39 | तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल. |
40 | थोरांचे सदगुण घेणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रध्दांजली ! |