माणसाचे विचार ही त्याची आयुष्याची पुंजी आहे. ज्या माणसाचा विचार भक्कम नाही त्याला आयुष्यात काहीच करता येत नाही. आपण अगदी शाळेपासूनच मराठी सुविचार शिकत असतो आणि ते आचरणात आणत असतो. मराठी माध्यमातून शिकलेल्या विद्यार्थ्यांना तर सुविचाराचे महत्त्व माहीत आहेत. रोज सकाळी फळ्यावर एक सुविचार सुवाच्च अक्षरात लिहिलेला हमखास प्रत्येक शाळेत दिसून यायचा. हेच सुंदर सुविचार मराठी (Suvichar Marathi Madhe) आयुष्यात आपल्याला योग्य मार्गावर जगण्यासाठी बळ देत असतात.
1. भरलेला खिसा हा माणसाला नेहमी दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो
2. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, म्हणूनच ते विजेते ठरतात
3. अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. अपयशाने कधीच खचून जाऊ नका
4. अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे !
5. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत कायम मनगटात ठेवा
6. समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. तुम्हीही संकटांचा सामना करताना शांत राहा
7. विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो
8. संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात कायम असतं
9. टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा. कारण असे मित्रच जास्त विश्वासघात करतात
10. थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायलाॉ काय हरकत आहे.
कधी कधी आपण उदास होतो आणि अशा वेळी प्रेरणेची आणि उत्साह देण्याची गरज असते. अशावेळी आपण मराठी सुविचार वाचून स्वतःमध्ये आत्मविश्वास आणू शकतो.
11. आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कोणत्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो
12. आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा
13. कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही
14. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही, तोपर्यंत सगळे काही शक्य आहे.
15. मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात
16. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर अपयश पचविण्यास शिका
17. जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा
18. जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण
19. जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा
20. ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
कोणाचेच आयुष्य हे सरळसोट नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हा असतोच. अशावेळी काही प्रेरणात्मक कोट्सची अथवा आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी विचारांची गरज असते.
21. खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या अधिक जवळ आलो
22. स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात
23. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा
24. आपण पाहत असलेली आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात
25. जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात
26. कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही
27. तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा
28. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा कारण ते जास्त महत्त्वाचं आहे
29. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपणूक ही आयुष्यभरासाठी
30. कोणतेही उद्दिष्ट मेहनती शिवाय साध्य होत नसते.
लोक तुमची स्तुती करोत वा निंदा, तुमचं लक्ष्य तुमच्यावर कृपा करो वा न करो, तुमचा मृत्यू आज होवो वा उद्या, आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका.
31. प्रत्येक दुःख हे आपल्याला एक नवा धडा शिकवते आणि प्रत्येक शिकलेला धडा हा माणसाला बदलतो.
32. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येकवेळी अजून एकदा प्रयत्न करणे हाच आहे हे कायम लक्षात ठेवा.
33. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा.
34. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा तुमची प्रगती होत आहे.
35. नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.
36. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय सध्या होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात.
37. आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकाल हे खरं आहे.
38. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष्य प्राप्त करत नाही.
39. जितका मोठा संघर्ष असेल तितकेच तुमचं यश शानदार असेल.
40. जितका मोठा संघर्ष असेल तितकेच तुमचं यश शानदार असेल.