रविवारी घाटकोपरहून ठाण्याला जाणाऱ्या बसमध्ये एका वृद्धाला हृदयविकाराचा झटका आला, त्यादरम्यान कंडक्टरने धाव घेत त्यांचे प्राण वाचवले. कंडक्टरला दिलेल्या प्रशिक्षणामुळे एकाचा जीव वाचला. या घटनेनंतर कंडक्टरचे सर्वत्र कौतुक होत आहे. बेस बसमधून प्रवास करणाऱ्या रोहिदास रामचंद्र पवार यांना हृदयविकाराचा झटका आला. बस मुलुंड चेकनाक्यावर पोहोचताच रोहिदास यांना चक्कर आली ही घटना रविवारी पहाटे 2.20च्या दरम्यान घडली. बस कंडक्टर अर्जुन पांडुरंग लाड यांनी रोहिदास यांना सीपीआर देऊन त्यांचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Investment Tips: गुंतवणूक करताय? मग लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी
Braveheart #Mumbai B.E.S.T bus conductor saves the life of a senior citizen by performing CPR in a running bus between Ghatkopar and Thane. @myBESTBus https://t.co/AkAmNt47sZ pic.twitter.com/fu9USsjPV3
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) December 10, 2023