IPL इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूंची संपूर्ण यादी, जाणून घ्या कोण आहे आघाडीवर

WhatsApp Group

Most expensive players in IPL: या मिनी लिलावात एकूण 405 खेळाडूंपैकी 273 भारतीय आणि 132 विदेशी खेळाडू आहेत. कॅप्ड खेळाडूंची एकूण संख्या 119 आहे, अनकॅप्ड खेळाडू 282 आहेत आणि 4 सहयोगी देशांचे आहेत. कमाल 87 स्लॉट उपलब्ध आहेत त्यापैकी 30 परदेशातील खेळाडूंसाठी राखीव आहेत. आयपीएल लिलावाचा इतिहास खूप मजबूत राहिला आहे. आत्तापर्यंत असे अनेक खेळाडू घडले आहेत ज्यांच्यावर फ्रँचायझींनी मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव केला आहे. लिलावापूर्वी अशा 7 खेळाडूंबद्दल जाणून घेऊया ज्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव झाला आहे.

ख्रिस मॉरिस

ख्रिस मॉरिस हा आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. आयपीएल 2021 च्या लिलावात मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले.

युवराज सिंग

आयपीएल लिलावाच्या इतिहासात भारताचा युवराज सिंग हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. युवीला 2015 च्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 16 कोटींना विकत घेतले होते.

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सला केकेआरने 2020 च्या लिलावात 15.5 कोटी रुपयांना विकत घेतले. केकेआरने आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी कमिन्सला सोडले होते. त्यानंतर KKR ने त्याला IPL 2022 च्या लिलावात 7.25 कोटींना खरेदी करून संघात पुन्हा सामील करून घेतले.

Dhoni-Virat-Rohit की Gambhir, आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी कर्णधार कोण? जाणून घ्या…

ईशान किशन

2022 च्या लिलावात 15.25 कोटी रुपये पाहून मुंबई इंडियन्सने अनुभवी स्फोटक फलंदाज इशान किशनचा संघात समावेश केला होता.

काइल जॅमिसन

आयपीएल लिलावाच्या इतिहासात काइल जेमिसनही खूप महागडा ठरला आहे. काईल जॅमिसनला आरसीबीने 2021 च्या लिलावात 15 कोटींना विकत घेतले.

बेन स्टोक्स

आयपीएल लिलावात बेन स्टोक्सला 2017 च्या आयपीएल लिलावात टीम रायझिंग पुणे सुपरजायंट्सने 14.5 कोटींना विकत घेऊन त्याच्या संघात समाविष्ट केले होते.

दीपक चहर

भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला 2022 च्या लिलावात चेन्नईने 14 कोटींना विकत घेऊन संघात समाविष्ट केले होते. मात्र, दुखापतीमुळे दीपक 2022 ची आयपीएल खेळू शकला नाही.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा