ठाणे – ठाण्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची काल (मंगळवारी) ‘उत्तर’सभा झाली. या सभेमध्ये मनसेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांचा सत्कार करताना तलवार भेट दिली होती. या सभेमध्ये तलवार दाखवणं आता अंगलट आलं आहे.
या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तसेच मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) शहर अध्यक्ष रवी मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल राज ठाकरे यांच्या ठाण्यातील उत्तरसभेच्या दरम्यान त्यांचा मनसे नेत्यांनी तलवार देत सत्कार केला होता आणि हा सत्कार करुन झाल्यावर राज ठाकरे यांनी ही तलवार सभेला दाखवल्याप्रकरणी त्यांच्यावर आता गुन्हा नौपाडा पोलिस ठाण्यामध्ये (Naupada Police Station) आर्म्स कायद्यन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी तलवार दाखवल्या प्रकरणीचा हा गुन्हा आहे.
As per Maharashtra Home Department, a case will be registered against MNS chief Raj Thackeray under Arms Act in connection with an event in Thane, where he raised a sword
— ANI (@ANI) April 13, 2022
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तलवार उंचावल्याप्रकरणी मोहित कंबोज, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला होता. राज ठाकरे यांच्यावरही आता अशाच स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.