मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात मुंबईत पोलिसांत तक्रार

WhatsApp Group

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झालेली असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला होता. तसेच त्यांनी काही जणांची भेटही घेतली होती. आपलं वर्षा हे निवासस्थान सोडण्यापूर्वीही त्यांनी कार्यकर्त्यांची देखील भेट घेतली होती. दरम्यान, यावरून भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे म्हणत तेजिंदर पाल यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यांनी ऑनलाइन पद्धतीने मलबार हिल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे . त्यांनी खुद्द आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे.