सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर कमेंट करणं लॅबुशेनला पडलं महागात, संतप्त चाहते म्हणाले – तू लंगोटात होता तेव्हा…

WhatsApp Group

भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या ट्विटवर टिप्पणी केल्याबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मार्नस लॅबुशेनला टीकेला सामोरे जावे लागले आहे. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने कॉमनवेल्थमध्ये क्रिकेटच्या पुनरागमनावर भाष्य केले. सचिनच्या ट्विटला सहमती दर्शवत मार्नस लॅबुशेन याने प्रतिक्रिया दिली की, ‘सचिनशी सहमत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत हा एक अप्रतिम सामनाही होणार आहे. त्याच्या याचं विधानामुळे तो अडचणीत आला.

सचिन तेंडुलकरला फक्त “सचिन” म्हटल्याबद्दल चाहत्यांनी लाबुशेनला घेरले की तो महान क्रिकेटरला पूर्ण आदर देत नाही. वापरकर्त्यांनी लबुशेनकडे तात्काळ माफी मागून “सचिन सर” म्हणण्याची मागणी केली. सचिनने 24 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत जागतिक क्रिकेटमध्ये खूप नाव कमावले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांसह सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर आहे. सचिनचे हे यश पाहून चाहते लबुशेनला सचिनला सर म्हणायला सांगत आहेत.

एका चाहत्याने लिहिले की, सचिनने पदार्पण केले तेव्हा तू लंगोटात होता, थोडा आदर दाखव, तर एका चाहत्याने लिहिले की, कोणताही भारतीय खेळाडू सचिनसोबत असं बोलत नाही.