कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

WhatsApp Group

Comedian Raju Srivastava passed away: जगातील प्रसिद्ध विनोदी कलाकार आणि भारतातील सर्वोत्तम विनोदी कलाकारांपैकी एक असलेले राजू श्रीवास्तव यांचं निधन झालं आहे. त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयामद्धे अखेरचा श्वास घेतला. 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआऊट करत असताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. जीवन आणि मृत्यू यांच्यातील 40 दिवसांची लढाई लढल्यानंतर आज या कॉमेडियनचे निधन झाले.

राजू श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. या कॉमेडियनला प्रथम आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले. सर्व प्रयत्न करूनही डॉक्टर राजू श्रीवास्तव यांना वाचवू शकले नाहीत आणि सर्वांना रडवून सर्वांना हसवणारा विनोदवीर या जगाचा कायमचा निरोप घेतला.

राजू श्रीवास्तव यांनी 80 च्या दशकापासून मनोरंजन विश्वात संघर्ष करण्यास सुरुवात केली होती, परंतु त्यांना त्यांच्या प्रतिभेनुसार ओळख मिळू शकली नाही. मात्र, याच काळात राजू श्रीवास्तव यांनी बॉलीवूड सुपरस्टार अनिल कपूरच्या ‘तेजाब’ या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. तरीही राजूला अजून बराच पल्ला गाठायचा होता.वर्षामागून वर्ष लोटले पण राजूला हवी तशी प्रसिद्धी मिळत नव्हती. पण त्यानंतर 2005 ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. या कार्यक्रमामधील त्यांच्या परफॉर्मन्सचं अनेकांनी कौतुक देखील केलं.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा