Maharashtra Rain: राज्यात पावसाचं कमबॅक, ‘या’ जिल्ह्यांना येलो ॲलर्ट जारी

WhatsApp Group

मुंबई : गेले काही दिवसांपासून वरुण राजा शांत असला तरी आता पुन्हा एकदा दमदार कमबॅक (Come Back) करत राज्यातील विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यासह विदर्भामध्ये काल पासुन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने सकाळपासून चांगलाच जोर पकडला आहे.

मराठवाडा (Marathwada), पश्चिम महाराष्ट्रातील (North Maharashtra) आणि विदर्भाच्या विविध जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली असुन हवामान विभागाकडून येलो अलर्ट (Alert) जारी करण्यात आला आहे. नद्याकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागात एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

विदर्भातील भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia), नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. शहरी भागात पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात मात्र जोरदार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यासह (Marathwada) पश्चिम महाराष्ट्रात (North Maharashtra) देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह (Mumbai) उपनगरात देखील सकाळ पासून पावसाचा जोर आहे.