
बैलांच्या झुंजीदरम्यान स्टेडियमचा तीन मजली स्टँड कोसळल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. बैलांची झुंज (Bull Fight) पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अशामध्ये अचानक स्टेडियमच्या स्टँड कोसळला. पत्त्यांसारखा स्टँड कोसळत त्यावर बसलेले सर्व प्रेक्षक खाली पडले.
या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 540 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. ही घटना मध्य कोलंबियामध्ये (central Columbia) घडली आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे.
🚨BREAKING:
A stadium in Epsinal, Colombia has collapsed during a bullfight show. Reports of 5 people dead, 540 injured. Number expected to climb sadly. 💔 pic.twitter.com/FShGpCEgM5— PollyWannaCrakker (@pollysbirdcage) June 26, 2022
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बैलांची झुंज पाहण्यामध्ये सर्व लोकं व्यस्त आहेत. त्याचवेळी अचानक स्टेडियमचे तीन मजले कोसळतात. स्टँड कोसळताच लोकांचा आरडाओरडा सुरु होतो. कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडतो आणि सर्वजण इकडे तिकडे पळू लागतात. या दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला तर 540 पेक्षा अधिक जण जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.